मराठी अनुवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी अनुवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

रंजिश ही सही २०२४/१०

 



नमस्कार 

उर्दू गझल शायरी सर्वांना आवडतेच पण मराठी रसिकांना त्या शायरीचा पूर्ण अर्थ कळतोच असं नाही. म्हणून काही गझलांचा मी त्याच चालीत मराठी अनुवाद केला आहे. 

'रंजिश ही सही' ही गझल सगळ्यांच्याच आवडीची, पण पहिल्याच 'रंजिश' या शब्दाचा अर्थ कदाचित माहित नसेल. रंजिश म्हणजे कटुता. एखादं नातं बिघडलं की निर्माण होणारा दुरावा. 

ही मूळ गझल आणि मी तिचा केलेला मराठी अनुवाद देत आहे. मी गायलेल्या व्हिडीओची लिंक देखील आहेच. 

वाचता वाचता एकता येईल, ऐकता ऐकता वाचता येईल. प्रतिक्रियांचं अर्थातच स्वागत आहे. 

 ग़ज़ल -

रंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिए आ 

आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ ||

पहले से मरासिम न सही, फिर भी कभी तो 

रस्मो-रहे-दुनिया ही निभाने के लिए आ ||

माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत 

चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ ||

इक उम्र से हूँ लज्ज़ते गिर्यां से भी महरूम 

ऐ राहते जां मुझको रुलाने के लिए आ ||

जैसे तुझे आते हैं न आने के बहाने 

ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ ||


मराठी अनुवाद -

भंगली जरी प्रीत, छळायास तरी ये 

ये फिरुनि मजसि दूर करायास तरी ये||

उरली जरी नाही तुला ती ओढ जुनी ग 

जनरीत म्हणुनि क्षेम पुसायास तरी ये ||

खुलते खरी प्रीती जरी मुग्धाच अबोली

हलकेच नजरभेट घडायास तरी ये ||

ओठंगले नेत्रातळी अश्रूही कधीचे

एकवार त्या सरींत भिजयास तरी ये ||

सुचती मला टाळायचे तुज लाख बहाणे 

एकदा सखे चिरकाल राहायास तरी ये||




 

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

आश्ना -उर्दू शायरीची मराठी सखी भाग १ Blog no. 2024/5

 


                                  

उर्दू शायरी, ग़ज़ल, या काव्यप्रकारात काही वेगळीच खुमारी आहे, लज्जत आहे. भाषेची नजाकत, शायराचं कविकल्पनेत स्वतःला झोकून देणं, त्यामुळे होणारी अतिशयोक्ती, हे सगळंच फार तरल, लोभस आहे. उर्दू शायरी न वाचणाऱ्या मराठी रसिकांपर्यंत ते वैभव आणावं म्हणून मी त्या शेरांचा मराठी काव्यपंक्तींत अनुवाद करायला सुरुवात केली. त्याचं पुस्तक झालं. त्यातलीच पानं स्कॅन करून मी इथे टाकते आहे, जेणेकरून त्यातील चित्रं देखील वाचकांना बघता येतील आणि पुस्तक वाचतो आहोत असं वाटेल. माझंच पुस्तक असल्यामुळे कॉपीराईटचाही प्रश्न नाही.  या पहिल्या भागात बघूया हे काही शेर ‘शायरी, ग़ज़ल,’ या विषयावरचेच –






यातील काही भागाचा दृक्श्राव्य अनुभव घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा.




हे पुस्तक माझ्याच आवाजात स्टोरीटेलवर आहे. https://www.storytel.com/books/ashana-1475376?appRedirect=true

तेही तुम्ही ऐकू शकता.

 

 

आणखी एक ( किती?) बळी! २०२५/८

                                आणखी एक ( किती?) बळी! “ एखाद्या तात्कालिक कारणावरून दाम्पत्यात वाद झाला आणि त्यातून पतीने पत्नीला मारहाण क...