अद्भुत संस्कृत

नमस्कार,
संस्कृत एक
अद्भुत भाषा. आजच्या लेखात संस्कृतची
महती. एकच गोष्ट स्पष्ट करते. संस्कृत हा
माझ्या आवडीचा विषय आहे – अभ्यासाचा नाही. कदाचित एखादी चूक होऊ शकते. तेव्हा
चूकभूल देणे-घेणे
सुसुवातीला
मुंडक उपनिषदाचा हा शांतिपाठ
ॐ भद्रं
कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं
पश्येमाक्षभिर्यजत्राः
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाँसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः|
स्वस्ति न
इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्त नः पूषा विश्ववेदाः
स्वस्ति
नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः , स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||
हे देवांनो, आम्हाला कानांनी मंगलकारक ऐकायला मिळो, डोळ्यांनी
चांगलं पाहायला मिळो. स्थिर (निरोगी) आणि सुदृढ अशा अवयव आणि शरीरासह आम्हाला
दीर्घायुष्य प्राप्त होवो. इंद्र, पूषण,गरुड देव, आणि बृहस्पती आमचं कल्याण करो.
संस्कृत भाषा
कशी आहे तर -
भाषासु मुख्य मधुरा दिव्या गीर्वाणभारती
तत्रापि
काव्यं मधुरं, तस्मादपि सुभाषितम्||
संस्कृत
ही किती समृद्ध भाषा आहे हे सिद्ध करणारा पुढचा श्लोक. यात केवळ ‘न’ हे एकच अक्षर वापरूनच पूर्ण अद्भुत
श्लोक तयार केलेला आहे. किरातार्जुनीयम् काव्यसंग्रहातील हा श्लोक भारवि या
महाकविने रचलेला आहे.
न
नोननुन्नो नुन्नोनो नाना नानानना ननु।
नुन्नोऽनुन्नो
ननुन्नेनो नानेना नुन्ननुन्ननुत्॥
अनुवाद -दुर्बलाकडुन होइ विद्ध जो
दुर्बलावरी
करी मात जो
म्हणावेच
ना नर हो त्याला
संबोधावे भेकड त्याला
अर्थ - आपल्याहून
दुर्बल असलेल्याकडून जो मात खातो किंवा पराभव स्वीकारतो तो आणि आपल्यापेक्षा
दुर्बल असलेल्यावर जो हात उगारतो अशा दोघांनाही माणूस म्हणू नये, भेकड म्हणावे.
रामकृष्ण विलोम काव्य, हा आणखी एक अद्भुत प्रकार.
14 व्या शतकात दैवज्ञ सूर्यकवी नावाच्या कवीने रामकृष्ण
विलोमकाव्य लिहिलं. विलोम म्हणजे डावीकडून किंवा उजवीकडून कसंही वाचलं तरी शब्द
तेच असतात. साधे उदाहरण म्हणजे ‘समास’ हा शब्द. कसाही वाचला तरी ‘समास’ असाच
राहतो. तर हे विलोम काव्य अद्भुत अशासाठी की ते सरळ वाचलं तर श्रीरामाचं चरित्र
किंवा स्तुती आहे आणि उलटीकडून वाचलं तर श्रीकृष्णस्तुती आहे. यातली ही एक ओळ-
तं भूसुतामुक्तिमुदारहासं वंदे यतो भव्यभवं
दयाश्रीः
अर्थ – ज्याने भूमिकन्या सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्त
केलं, ज्याचं हास्य विलोभनीय आहे, ज्याचा अवतार श्रेष्ठ आहे,आणि ज्याच्याकडून सदैव
दया आणि भव्यता प्रक्षेपित होते अशा त्याला ( रामाला) मी वंदन करतो.
आता उलटीकडून वाचताना –
श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदा मुक्तिमुतासुभूतम्
अर्थ –ज्याच्या ठायी सूर्यचंद्राचं तेज आहे, ज्याने
विध्वंसक पूतनेचा संहार केला आणि जो विश्वात्मा आहे, अशा यादवकुलोत्पन्न श्रीकृष्णाला
मी नमन करतो.
असंच ‘ राघवयादवीयं’ हे आणखी एक रामकृष्णविलोम काव्य १७
व्या शतकात कांचीपुरमच्या कवी वेंकटाध्वरी यांनी लिहिलं.
त्यातला हा पहिला श्लोक
वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः ।
रामो रामाधीराप्यागो लीलामारायोध्ये वासे ॥ १॥
अर्थ – ज्यांच्या हृदयात सीता आहे, ज्यांनी पर्वत पार करून लंकेला
जाऊन रावणाचा वध केला आणि वनवास पूर्ण करून अयोध्येला आले त्या श्रीरामांच्या चरणी
मी प्रणाम करतो
आता उलटीकडून वाचताना –
सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः।
यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ॥ १॥
अर्थ – जो सदैव माता लक्ष्मीसह विराजमान आहे, ज्याच्या
शोभेपुढे सर्व जडजवाहिराची शोभा फिकी आहे,
जो रुक्मिणी आणि गोपींना पूज्य आहे, अशा श्रीकृष्णाच्या चरणी मी प्रणाम करतो
काय अफाट ही प्रतिभा आणि काय ही संस्कृतची क्षमता !
हल्ली अशी भीती व्यक्त केली जाते की संस्कृत भाषा लोप पावत
चालली आहे. तसं होऊ नये म्हणून पूज्य श्री
वरदानंद भारती यांनी ईश्वराकडे पसायदान मागितलं आहे. तेच आपणही मागू या.
करुणानिधे प्रभो, नो दोषान् क्षमस्व भगवन्|
सुचिरात्प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन||
भुविभूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा|
श्वसितीव देवभाषा, तां पालयस्व भगवन्||.
आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्धवेषा|
अधुना लवावशेषा, तां आश्रयस्व भगवन्||.
देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः|
समयं समर्घतायाः पुनरानयस्व भगवन्||
अर्थ – हे करुणाकर परमेश्वरा, आमच्या दोषांना क्षमा कर. दीर्घकाळ
निद्रेत असलेल्या या देशाला ज्ञानाने जागृत कर. पृथ्वीतलावर सर्व भाषांची अभिलाषा
पूर्ण करणारी ही देवभाषा – संस्कृत – आज केवळ श्वसन करते आहे, तिचा सांभाळ कर. पूर्वी ही देववाणी विशुद्ध रूपाने वास करत होती, आता ती अवशेष मात्र शिल्लक राहिली आहे. तिला तू आश्रय दे. हे परमेश्वरा, या देशाला स्वतंत्रता, प्राचीन सभ्यता आणि
वैभवसंपन्नतेच्या काळाकडे पुन्हा घेऊन जा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा